माजी जि.प. अध्यक्ष गोट्या सावंत यांनी घेतला पुढाकार
*⚡कणकवली दि२९-:* कणकवली तालुक्यातील नाटळ रामेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता पुरात वाहून गेला होता. पावसाचे प्रमाण कमी होताच पोकलॅन व डंपरच्या सहाय्याने माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांनी स्वखर्चाने रस्त्याच्या खचलेल्या भागात भराव घालण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे लवकरच हा मार्ग वाहतुकीस पावसाळ्याच्या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात सुरू होणार आहे. पावसाळ्यानंतर या कामासाठी जि. प. च्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. पूरस्थितीनंतर गोट्या सावंत यांनी मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
