जीवनावश्यक वस्तूंच्या 70 पिशव्या खर्डी येथे जाऊन केल्या सुपूर्द
*💫कणकवली दि२९-;* चिपळूण येथे झालेल्या पुरामुळे उध्वस्थ झालेल्या लोकांना एक मदतीचा हात म्हणून फोंडाघाट येथील संदेश साळुंके फाऊंडेशन व संदेश पटेल मित्र मंडळाच्या सदस्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या 70 पिशव्या लोकांना खर्डी येथे जाऊन सुपूर्द केल्या. संदेश साळुंके फाऊंडेशन व संदेश पटेल मित्र मंडळाच्या सदस्यांनी 4 किलो तांदूळ, 2 किलो गव्हाचे पिठ, साबण, पाण्याच्या बाटल्या, बिस्किट पुडे, महिलांसाठी सॅनिटरी पॅड ,मेणबत्ती,माचिस या वस्तू दिल्या आहेत.यावेळी या मदतीमुळे पूरग्रस्त खरडी गावातील लोकांसाठी काहीतरी करता आले याचा आनंदही होता. त्याचबरोबर त्यांची परिस्थीती पाहुन मन सुन्न झाले होते.इश्वर करो असा प्रसंग कुणावरही कधी येऊ नये.अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.यावेळी राज सावंत, जितेंद्र सावंत, सिद्धेश भस्मे, वैभव साळुंके होते.ज्या ज्या लोकानी या कार्यात मदत केली त्या लोकांचे आभार संदेश साळुंके फाऊंडेशन व संदेश पटेल मित्र मंडळाच्या सदस्यांनी मानले.
