नदीपात्रातील गाळ उपसा करण्यासाठी शासनाने लवकर निर्णय घ्यावा : रवींद्र मडगावकर

सावंतवाडी पंचायत समिती मासिक सभा संपन्न

*💫सावंतवाडी दि.२८-:* तालुक्‍यात पूरपरिस्थितीमुळे नदीपात्रालगतच्या शेतकऱ्यांच्या शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, याला केवळ नदीपात्रातील गाळ कारणीभूत असून हा गाळ उपसा करण्यासाठी शासनाने निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य रवींद्र मडगावकर यांनी केली. तसेच ज्यांनी नदीपात्रात अतिक्रमण केले अशांवरही कारवाई याबाबत सर्वानुमते ठरावही घेण्यात आले. सावंतवाडी पंचायत समितीची मासिक सभा सभापती निकिता सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या सभेत अतिवृष्टीमुळे तालुक्यातील गावातील झालेल्या नुकसानीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी खारलॅडचे निकष तेरेखोल नदीला लागू करावे अशी मागणी बाबु सावंत यांनी केली तर सावंतवाडी आंबोली मार्गावर मोठ्या प्रमाणात दरडी व झाडे कोसळत असल्याने धोकादायक ती हटवा गाळेल सारखी पुनरावृत्ती नको, अशी मागणी सदस्या प्राजक्ता केळुसकर यांनी केली..

You cannot copy content of this page