लेखी आश्वासन न दिल्याने उपोषण सुरूच
*💫कणकवली दि.२६-:* कणकवली तालुक्यातील बावशी येथील जय मल्हार स्वयं.सहायत्ता महीला बचत गटाच्या रद्द केलेल्या रेशनिंग प्रस्तावाला पुन्हा मुदतवाढ देण्यात येवू नये .या मागणीसाठी आज सकाळी पासून सुरू झालेले उपोषण अद्याप सुरूच असून आंदोलन ठिकाणी सायंकाळी उशिरा कणकवली तालुक्यातील तहसीलदार आर.जे.पवार, पुरवठा नायब तहसीलदार जिल्हा कार्यालय ओरोस संजय गवस ,तालूका पुरवठा अधिकारी ममता तांबे, नांदगाव मंडळ अधिकारी विद्या जाधव, नांदगाव तलाठी सुर्दशन अलकुटे आदी शिष्टमंडळाने आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. पण लेखी स्वरूपात आश्वासन न दिल्याने उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. यावेळी तहसीलदार पवार यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या सुचनेनुसार संबंधित भौगोलिक परिस्थितीचा पूर्ण सर्व्हे करून तसा अहवाल येत्या चार दिवसांत सादर करा यानंतर काय तो निर्णय घेतला जाईल व सध्या ज्या ठिकाणी. रेशनिंग दुकान आहे तेथेच चालू राहील असे तोंडी आश्वासन दिले व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली . मात्र आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन द्या अन्यथा आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे यामुळे आंदोलन मागे घेण्याच्या पवित्र्यात नसल्याने आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा दिला आहे. लेखी स्वरूपात आश्वासन न दिल्याने उपोषण सुरुच राहणार असल्याचा इशारा आंदोलन स्थळी ग्रा.पं.सदस्या मनश्री कांडर व दिपक कांडर यांनी दिला आहे.
