सामाजिक बांधिलकी जोपासत अन्नधान्याची मदत
*💫मालवण दि.२६-:* चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आचरा येथील गावठी फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने ‘अन्नधान्य’ चिपळूण येथे पाठविण्यात आले. तरुणांनी सामाजिक बांधिलकी जोपासत घेतलेल्या सामाजिक पुढाकाराची आचरेवासीयांकडून दखल घेत कौतुक करण्यात आले. पूरग्रस्तांना आचरे गावातून मदतकार्य केले जावे, या दृष्टीने गावठी फ्रेंड्स ग्रुपचे सदस्य प्रथमेश पांगे यांनी संकल्पना मांडली. याबाबत सर्व सदस्यांनी तात्काळ सहमती दर्शवत आर्थिक नियोजन केले. त्यानंतर सर्व प्रकारचे अन्नधान्य खरेदी करून चिपळूण येथे रवाना करण्यात आले. ग्रुपचे सदस्य, न्यू इंग्लिश स्कुल आचराचे माजी विद्यार्थी प्रथमेश पांगे, विवेक गुरव, प्रसाद आचरेकर, सहदेव सुर्वे, चंदू भोगले, सुरज गावकर, जयप्रकाश आचरेकर, महेश शेटये, अभिषेक परब, विकास साटम आदी सदस्यांनी पूरग्रस्तांसाठी मदत करावी, असे आवाहन केले आहे.
