मल्हार नदीवरील पुलाची तात्काळ पुनर्बांधणी करा

राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी पालकमंत्री नाम.उदय सामंत यांचे लक्ष वेधले

*💫कणकवली दि२६-:* कणकवली तालुक्यातील अतिवृष्टीत कोसळलेल्या मल्हार नदीवरील पुलाची तात्काळ पुनर्बांधणी करण्यात यावी. लोकांच्या मुलभूत सोयी सुविधांसाठी तात्काळ पर्यायी मार्ग तात्पुरत्या स्वरुपाचा बनवून लोकांना येण्या – जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी राष्ट्रवादी नेते तथा कणकवली नगरपंचायत नगरसेवक अबिद नाईक यांनी पालकमंत्री नाम.उदय सामंत यांच्याकडे केली आहे. कणकवली तालुक्यातील नरडवे रस्त्यावरील नाटळ येथील मल्हारी पुल अतिवृष्टीमुळे कोसळला.याची पालकमंत्री उदय सामंत यांनी केली यावेळी राष्ट्रवादी नगरसेवक अबिद नाईक यांनी नाम.उदय सामंत यांचे निवेदन देत लक्ष वेधले. यावेळी राष्ट्रवादीचे सुभाष उर्फ बाबू सावंत, विलास गावकर उपस्थित होते. यावेळी अबिद नाईक यांनी नाम. उदय सामंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कणकवली नरडवे रस्त्यावरील नाटळ येथील मल्हारी पुल अतिवृष्टीमुळे कोसळले आहे . त्यामुळे पलिकडील पाच गावांचा संपूर्ण पूर्णपणे तुटला असून त्या पाच गावांमधील लोकांना आपल्या मुलभूत सोयी – सुविधांपासून वंचित झाले आहेत . तसेच त्यांना येण्या- जाण्याकरीता सुद्धा पर्यायी मार्ग उपलब्ध नसून कणकवली सारख्या ठिकाणी येण्या – जाण्यासाठी १८ ते २० कि.मी. अंतर तोडून यावे लागणार आहे . त्यामुळे तेथील लोकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे . तरी लोकांच्या मुलभूत सोयी सुविधांसाठी तात्काळ पर्यायी मार्ग तात्पुरत्या स्वरुपाचा बनवून लोकांना येण्या – जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करावी . तसेच त्याचबरोबर मल्हारी पुल पुर्नबाधणीसाठी तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी नगरसेवक अबिद नाईक यांनी केली असून पालकमंत्र्यांनी अबिद नाईक यांच्या मागणीचा निश्चितपणे विचार केले जाईल असे आश्वासन दिले.

You cannot copy content of this page