चारचाकी वाहनातील तिघेजण बचावले ढिगाऱ्याखाली एक दुचाकीस्वार युवक अडकल्याची भीती;कोणी बेपत्ता असल्यास पोलीसांशी संपर्क करण्याचे आवाहन
*💫बांदा दि.२३-:* बुधवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बांदा – सटमटवाडी – गाळेल रस्त्यानजीक असलेला डोंगर कोसळून थेट रस्त्यावर आला आहे. या घटनेत चारचाकी वाहनातील तिघेजण बचावले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मातीच्या ढिगाऱ्याखाली एक दुचाकीस्वार युवक अडकल्याची भीती आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी सायंकाळी उशिरा याठिकाणी भेट देत पाहणी केली. दुपारी जिल्हा पोलीस उपअधीक्षक नितीन कट्टेवार, नायब तहसीलदार प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक अनिल जाधव, सभापती निकिता सावंत, सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे, तलाठी वर्षा नाडकर्णी, उपनिरीक्षक समीर भोसले, सरपंच अक्रम खान, माजी सरपंच मंदार कल्याणकर, डिंगणे उपसरपंच जयेश सावंत, विशांत पांगम यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या मार्गावरून जिल्ह्यातील अनेक भागातील युवक गोव्यात कामाला जात असतात. यातीलच एक युवक या ढिगाऱ्याखाली अडकण्याची शक्यता असल्याने आपल्या भागातील एखादा युवक रात्रीपर्यंत घरी न आल्यास बांदा पोलीस स्टेशन (०२३६३-२७०२३३) किंवा निरीक्षक अनिल जाधव (९३७०९२१७९३) वर संपर्क साधावा असे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे.
