*💫सावंतवाडी दि.२३-:* सावंतवाडी शहरातील हार्डवेअर दुकानात झालेल्या चोरीच्या तपासासाठी अटकेत असलेला संशयित आरोपी विनोद परशुराम घणके (३०, सध्या रा. कोलगाव,मूळ रा. सांगली) याची सावंतवाडी न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. सालईवाडा येथील हार्डवेअर दुकानातील चोरीच्या तपासासाठी सावंतवाडी पोलिसांनी त्याला अटक केली होती. आज त्याला न्यायालयात हजर केले असता वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य़ मानून न्यायालयाने संशयित आरोपीची जामिनावर मुक्तता केली आहे. संशयित आरोपीतर्फे अॅड. संकेत नेवगी व अॅड. लेखराज मडकईकर यांनी काम पहिले.
शहरातील हार्डवेअर दुकानातील चोरीप्रकरणी संशयिताची जामिनावर मुक्तता
