*💫कणकवली दि.२३-:* दिगवळे रांजणवाडी येथे सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या जाधव यांच्या घरावर दरड कोसळली. या घटनेची माहिती मिळताच माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी रांजणवाडी येथे धाव घेतली आणि गावातील युवकांच्या मदतीने माती बाजूला काढून एका जखमी व्यक्तीस बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. सावंत यांंनी दाखवेल्या या तत्परतेबद्दल नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे पावसामुळे संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या कणकवली येथील राहात्या घरात पाणी शिरून प्रचंड नुकसान झालेले असताना सुद्धा त्याची पर्वा न करता अशा परिस्थितीतही गोट्या सावंत नागरिकांच्या मदतीसाठी धावले. सावंत यांची कार्यतत्परता याआधीही जनतेने अनुभवली असून स्वत:चे घर संकटात असताना सुद्धा दिगवळे येथे जाऊन सावंत यांनी केलेल्या मदतकार्याचे विशेष कौतुक होत आहे. दरम्यान, या दुर्घटनेत संगीता जाधव (४०) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.तर श्री.सावंत यांच्या घरातील फर्निचर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
स्वत:चे घर संकटात असतानाही दिगवळे येथे जात गोट्या सावंत धावले मदतीला
