अतिवृष्टीमुळे हेत मौंदे मार्गावरील वाहतूक ठप्प

*💫वैभववाडी दि.२३-:* तालुक्यात बुधवारी व गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे हेत मौंदे मार्गावर अनेक ठिकाणी दरडी पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे भोम, मौंदे, आखवणे गुरववाडीचा संपर्क तुटला आहे. हेत मौंदे मूळ रस्ता अरुणा धरण प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेल्यामुळे पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे.गेले काही दिवस तालुक्यात अतिवृष्टी होत आहे.या अतिवृष्टीमुळे गुरुवारी राञी या रस्त्यावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे या रस्त्यावरील वाहातूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.त्यामुळे भोम, मौंदे, आखवणे गुरववाडीचा संपर्क तुटला आहे.या मार्गावरील दरड बाजूला करुन मार्ग वाहातूकीस मोकळा करावा.अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने सरपंच आर्या कांबळे यांनी मध्यम पाटबंधारे विभागाकडे केली आहे. हेत मौंदे या रस्त्यावर संभाव्य दरडी कोसळण्याची शक्यता आहे.अशा ठिकाणी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

You cannot copy content of this page