मुसळधार पावसामुळे तालुक्यात पूरस्थिती

घरांच्या भिंती कोसळल्याने अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान;महसूल नायब तहसीलदार प्रदिप पवार यांनी दिली माहिती

💫सावंतवाडी दि.२२-: सावंतवाडी तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली. या पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरांच्या भिंती कोसळून अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळण्याचे प्रकारही घडले आहे. मात्र सुदैवाने तालुक्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही नाही, अशी माहिती महसूल नायब तहसीलदार प्रदिप पवार यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह तालुक्यात गेले चार दिवस मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. या मुसळधार पावसामुळे तळवणे व मळगाव येथील एका घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. तळवडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे शप्पर कोसळून नुकसान झाले आहे. तसेच डेगवे येथील दोन घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. सांगेली, येथील घरावर झाड कोसळून नुकसान झाले आहे. अजूनही पाऊस कोसळत असल्याने अजूनही नुकसान होण्याची शक्यता आहे.

You cannot copy content of this page