साहस प्रतिष्ठान संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनी वेंगुर्ले येथे स्थापना
*💫ओरोस दि.२०-:* साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला येथें सोमवार 19 जुलै 2021 रोजी दिव्यांग बंधू-भगिनींचा नवीन शौर्य दिव्यांग बचत गटाची स्थापना करण्यात आली.हा गट राष्ट्रीय व राज्य नागरी उपजीविका अभियान अंतर्गत नगरपरीषद वेंगुर्लेस जोडण्यात आला. यावेळी दिव्यांग बंधू-भगिनी, पालक,अध्यक्ष श्रीम. रूपाली पाटील, विश्वस्त ज्योती मडकईकर, नगरपरिषद वेंगुर्ला चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठोंबरे व समुदाय संघटक अतुल अडसूळ उपस्थित होते. “साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग” यां रोपट्याला 4 वर्षे पुर्ण झाली. हा चौथा वर्धापन दिन.”दिव्यांग बंधू-भगिनींचा सर्वांगीण विकास न्याय व हक्क यासाठी कटिबद्ध”, हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून सतत कार्यरत असणारी ही संस्था. हितचिंतकांच्या व देणगी दात्यांच्या सहकार्याने अविरत सुरू आहे. दिव्यांग बांधवां प्रति सर्व कर्तव्ये निष्ठेने पार पाडत आहे. आम्हांस “साथ हवी सन्मानाची जिद्द भरारी घेण्याची,” असे बोलताना रुपाली पाटील यानी सांगितले.
