सभापती व तहसीलदार यांनी केली होती सूचना
*💫कणकवली दि.१९-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव वाशिनवाडी येथील लक्ष्मण आत्माराम मोरये यांचे मागील महिन्यात जीर्ण झालेल्या घरांची भिंती पडून नुकसान झाले होते. ते सध्या तेथे आडोशाला चटई लावल्या आहेत आता तर अतिवृष्टीमुळे आणखी भिंती पडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कणकवली सभापती मनोज रावराणे, तहसीलदार आर .जे .पवार व गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या सुचनेनुसार नांदगाव ग्रामपंचायतीच्यावतीने भिंती भिजू नये म्हणून ताडपत्री देण्यात आली आहे. यावेळी नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर,ग्रामविस्तार अधिकारी हरमळकर, नांदगाव वाशिनवाडी येथील ग्रामस्थ पांडुरंग मोरये आदी उपस्थित होते.
