भाजपातर्फे शुभांगी क्लिनिकला ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर

जिल्हाध्यक्ष राजन तेली यानी केले प्रदान

*💫सावंतवाडी दि.१७-:* भाजपतर्फे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते शुभांगी क्लिनिकच्या डॉ. भक्ती कांडरकर व डॉ. भालचंद्र कांडरकर यांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आला आहे. कोरोना काळात प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. डॉक्टरांचा यात सिंहाचा वाटा आहे. ते प्रत्येक रुग्णांची अगदी प्रामाणिकपणे सेवा करत आहेत. येथील शुभांगी क्लिनिकच्या डॉ. कांडरकर यांनी सुद्धा कोरोना काळात चांगली सेवा दिली आणि देत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल भाजपने घेतली व त्यांना ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आला. त्या करत असलेल्या कार्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे आभार मानले. यावेळी डॉ. कांडरकर, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, माजी सभापती पंकज पेडणेकर, बाळू साळगावकर, जालिंदर परब, शैलेश भिसे, रामा गावडे, मंगलदास पेडणेकर, बाळू कांडरकर, प्रविण लोके, अनिल परब, बाबू मांजरेकर, महेंद्र परब, मनोज नाईक, आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी डॉ. कांडरकर यांनी भाजपचे तसेच उपस्थितांचे आभार मानले व अशीच सेवा करत राहणार असल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page