*💫वेंगुर्ले दि.१७-:* श्री माऊली विद्या मंदिर रेडी प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून समिधा रावजी राणे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.माध्यमिक शालांत परीक्षा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे मार्फत प्रथमच मूल्यमापन कार्यपद्धतीवर ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. श्री माऊली विद्या मंदिर रेडी या प्रशालेत तून ३१ विद्यार्थी माध्यमिक शालांत परीक्षेस प्रविष्ट झाले होते. ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक समिधा रावजी राणे ८६.८० टक्के द्वितीय क्रमांक वृद्धिका प्रदीप कृष्णाची ८४.६० टक्के तृतीय क्रमांक कीर्ती प्रकाश राणे ८३.४० टक्के गुण मिळवून त्यांनी बाजी मारली असल्याने संस्था पदाधिकारी,प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
श्री माऊली विद्या मंदिर रेडी मधून समिधा राणे ८६.८० टक्के गुणांसह प्रथम
