यश संतोष मडवळ प्रथम तर आस्था अच्युत सावंत -भोसले द्वितीय
*💫सावंतवाडी दि.१७-:* राज्यात दहावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर प्रथमच अंतर्गत मूल्यमापनाचे आधारे दहावीचा निकाल काल जाहीर करण्यात आला असून शहरातील शांती निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल सावंतवाडी या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून यात प्रथम क्रमांक यश संतोष मडवळ याने ९६.८० टक्के गुण मिळवत प्राप्त केला आहे तर द्वितीय क्रमांक आस्था अच्युत सावंत भोसले हिने ९६.४० गुण प्राप्त केला आहे तर तृतीय क्रमांक अनिरुद्ध अजय नाईक व क्षितिज सुनील भूसनवार यांनी ९४ टक्के गुणवत्ता प्राप्त केला आहे.
