Headlines

गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांना तळेरेवासियांची साश्रुनयनांनी आदरांजली

तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ आयोजित शोकसभेमध्ये अनेकांचे डोळे पाणावले

*💫कणकवली दि.१६-:* सिंधुदुर्गचे सुपुत्र, ज्येष्ठ पत्रकार, अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्ष, गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या दृकश्राव्य माध्यमातून शोकसभेत अनेकांचे डोळे पाणावले. यावेळी उपस्थितांनी मधुसूदन नानिवडेकर यांच्या हृदय आठवणींना उजाळा दिला.  अलिकडील तीन-चार वर्षे नानिवडेकर तळेरे येथे रहायला होते. त्यांचा तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ आणि येथील सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राशी सलोख्याचे सबंध होते. त्यामुळे तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दृकश्राव्य माध्यमातून शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थीत मान्यवरांनी विविध मते व्यक्त केले. सुरेश भट यांच्यानंतर मराठीमध्ये गझल या काव्यप्रकारच्या समृद्धीचा वारसा नानिवडेकर यांनी जपला. त्यांचे निधन म्हणजे जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्राची खुप मोठी हानी असल्याचे मत अनेकानी व्यक्त केले. अनेकांना त्यांनी लिहिते केले आणि साहित्य क्षेत्रात असंख्य लिहित्या हातांना त्यांनी आपल्यासोबत घेऊन मार्गदर्शन केले. संपुर्ण महाराष्ट्रात त्यांच्या गझलेचा विशेष चाहता वर्ग आहे. असे मत साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले.  तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्यावतीने दृकश्राव्य माध्यमातून आयोजित शोकसभेला डाॅ. प्रकाश बावधनकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, सुप्रसिध्द कवी प्रा. प्रदीप पाटील (इस्लामपूर), सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुर्यकांत तळेकर, संतोष टक्के, नाधवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील, प्राचार्य बाजीराव जांभेकर, कवी लेखक प्रमोद कोयंडे, सदाशिव पांचाळ, राजेश जाधव, श्रावणी कम्प्युटर एज्युकेशन तळेरेच्या संचालिका सौ. श्रावणी मदभावे, सुधीर नकाशे, बाबा कोकाटे, अरविंद कुडतरकर, प्रा. सूरेश पाटील, वारगावचे मुख्याध्यापक हनुमंत वाळके, कोकिसरे हायस्कूलचे शिक्षक स्वप्निल पाटील, तळेरे‌ हायस्कुलच्या शिक्षिका धनलक्ष्मी तळेकर, तळेरे पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय मारकड, उपाध्यक्ष उदय दुदवडकर, उत्तम सावंत, सचिव संजय खानविलकर, निकेत पावसकर, सचिन राणे, गुरूप्रसाद सावंत, सतिश मदभावे, प्रा. विनायक पाताडे व अन्य उपस्थित होते. यावेळी तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाकडून नानिवडेकर यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

You cannot copy content of this page