*💫मालवण दि.१६-:* प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग तर्फे जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा गोळवण नं. १ येथे साने गुरुजी बालभवनाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा मिताली परब यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रसेवा दलाचे विश्वस्त शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या प्रेरणेतून तसेच शिक्षक भारतीचे राजाध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी सर्व शाळांमध्ये साने गुरुजी बालभवन तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने हे बालभवन बनविण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष पाताडे यांनी सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक तथा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, संतोष कोचरेकर, जिल्हा प्रतिनिधी लहू पाटील, संजय परुळेकर, उपशिक्षक श्रीकांत रेड्डी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय परुळेकर यांनी केले व आभार लहू पाटील यांनी मानले.
शिक्षक भारतीतर्फे गोळवण शाळा नं. १ येथे साने गुरुजी बालभवनाचे उद्घाटन
