*💫बांदा दि.१५-:* कुडाळ येथील चिमणी-पाखर डान्स क्लास अकॅडमी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन नृत्य स्पर्धेमध्ये बांदा येथील गीता प्रसाद यादव हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. गीता ही बांदा येथील खेमराज हायस्कुल मध्ये आठव्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. आपल्या नृत्य कलेचा ठसा उमटवणारी गीता ही येथील गौरी बांदेकर यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेत आहे. तिच्या स्पर्धेतील यशासाठी सर्व स्तरातून तीचे कौतुक होत आहे. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक सलोनी सावंत आणि साईल सातर्डेकर यांना विभागून देण्यात आला. तसेच तृतीय क्रमांक मृदुला तिरोडकर यांनी मिळविला. विजेत्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेमध्ये बांद्यातील गीता यादव प्रथम
