बांदा-डिंगणे रस्त्यावर डंपर कलांडला

*💫बांदा दि.१५-:* बांदा-डिंगणे रस्त्यावर बांबरवाडी येथे अवजड वाहतूक करणारा डंपर रत्याच्या कडेला कलांडून अपघातग्रस्त झाला. मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक डिंगणे रस्त्यावरून सुरू असल्यामुळे अरुंद रस्त्यावर अपघाताची शक्यता वाढली आहे. डिंगणे रस्ता हा अरुंद व वळणावळणांचा आहे. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना अवजड वाहने रस्त्यालगत रुतून अपघातग्रस्त होतात. या मार्गावर बेकायदा वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे डिंगणे ग्रामस्थांनी उपसरपंच जयेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली रात्रीच्या वेळी होणारी अवजड वाहतूक रोखली होती. सावंतवाडी तहसीलदारांनीही चालकांवर दंडात्मक कारवाई केली होती. मात्र काही दिवसांनी पुन्हा अवजड वाहतूक सुरू झाल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या वाहतुकीला आळा बसावा यासाठी महसूल प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी उपसरपंच जयेश सावंत यांनी केली आहे.

You cannot copy content of this page