मदर क्वीन इंग्लिश स्कूलच्या मृण्मय चंद्रकांत शिरोडकरचे ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत यश

*💫सावंतवाडी दि.१५-:* मृण्मय चंद्रकांत शिरोडकर याचे ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेमध्ये दैदीप्यमान असे यश संपादन केले आहे. या वर्षी गोरेज फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परिक्षेमध्ये ९३% गुण मिळवून मदर क्वीन इंग्लिश स्कूलच्या मृण्मय चंद्रकांत शिरोडकर यांने सिल्व्हर मेडल प्राप्त केले. या पूर्वीही दिल्ली येथून घेण्यात आलेल्या ऑलिंपिकयाड स्पर्धेत कु. मृण्मय याने इंग्रजी व गणित या विषयांमध्ये गोल्ड मेडल मिळवले होते. त्याच्या या यशाबद्दल संस्था चालक राजेसरकार राणीसरकार व प्राचार्य यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page