Headlines

वढू आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समिती शिवशंभू ऐतिहासिक लेखी परीक्षा जाहीर

*💫सावंतवाडी दि.१३-:* वढू आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समिती शिवशंभू ऐतिहासिक लेखी परीक्षा २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा दोन गटात होणार असून पहिला गट वय वर्ष ६ ते १३ असा लहान गट असून, दुसरा गट १४ वर्षा पुढील मोठा खुला गट आहे. या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची वयाची अट ठेवण्यात आली नसून, समिती तर्फे ज्येष्ठ इतिहास तज्ञ यांच्याद्वारे परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम ऑनलाईन द्वारे शिकवला जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी लहान गटात प्रथम क्रमांक २१०००/- द्वितीय क्रमांक ११०००/- तर तृतीय क्रमांक ७०००/- आणि मोठ्या गटासाठी प्रथम क्रमांक ५१०००/- द्वितीय क्रमांक २१०००/- तर तृतीय क्रमांक ११०००/- ठेवण्यात आले असून, या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नाममात्र २५१/- रुपये ही सहभाग शुल्क ठेवण्यात आले आहे . ही स्पर्धा ३ ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ३१ जुलै पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. यावेळी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी संघटनेमार्फत नियुक्त केलेल्या जिल्हा प्रमुख तसेच तालुका प्रमुख यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रमुख केशव नाचिवणेकर – 9673967679, जिल्हा प्रमुख युवती फिजा मकान दार – 8080231698, सावंतवाडी तालुका प्रमुख आदित्य कोळापटे – 7588034783, कणकवली तालुका प्रमुख तेजस गुरव – 9168507360, कुडाळ तालुका प्रमुख – 8956509331, मालवण तालुका प्रमुख ऐश्वर्य मांजरेकर -8263032804, देवगड तालुका प्रमुख – 9421928624, दोडामार्ग तालुका प्रमुख रोहन देसाई – 9404395950, वेंगुर्ला तालुका प्रमुख वैशाली वडर – 8412875703, वैभववाडी तालुका प्रमुख सायली महाजन – 7558225252 या क्रमांकावर संपर्क साधावा.

You cannot copy content of this page