थरारक पाठलाग गोवा बनावटी दारूसह ७ लाख १७ हजाराचा चा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली तपासणी पथकाची कारवाई;संशयिताचा पोबारा

*💫बांदा दि१२-:* गोव्याहून बांदा-ओटवणे मार्गावर मोटारीतून बेकायदा दारू वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या इन्सुली तपासणी पथकाला मिळाल्यावर सापळा रचत मोटारीचा थरारक पाठलाग करत ७ लाख १७ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र संशयिताने तांबोळी माऊली मंदिरनजीक मोटार जागेवर टाकून पोबारा केला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोव्याहून बांदा-ओटवणे मार्गावर मोटारीतून बेकायदा दारू वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या इन्सुली तपासणी पथकाला मिळाली होती. त्यानुसार ओटवणे येथे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या तपासणी नाक्यावर सापळा रचण्यात आला होता. त्यावेळी बांद्याहुन आलेल्या मोटारीला (एमएच ०७ एजी ७१९१) तपासणीसाठी थांबविण्याचा इशारा करण्यात आला, मात्र चालकाने सुसाट तांबोळीच्या दिशेने पलायन केले. पथकाने सुमारे ८ ते १० किलोमीटर मोटारीचा थरारक पाठलाग केला. तांबोळी माऊली मंदिराच्या पाठीमागे असलेल्या वरचीवाडी येथील मातीच्या रस्त्यावर संशयिताने मोटार रस्त्यातच टाकून जंगलात पलायन केले. पथकाने मोटारीतील गोवा बनावटीच्या विविध ब्रँडचे २ लाख १७ हजार ९२० रुपये किमतीचे ३५ खोके व ५ लाख रुपये किमतीची मोटार असा एकूण ७ लाख १७ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

You cannot copy content of this page