संजू परब यांच्यावर बोलण्याएवढी अपर्णा कोठावळे यांची उंची नाही….

अपर्णा कोठावळे यांनी संजू परब यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपच्या महिला शहरध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी दिले प्रत्युत्तर

*💫सावंतवाडी दि.०८-:* संजू परब यांच्यावर बोलण्याएवढी अपर्णा कोठावळे यांची उंची नाही. धनशक्तीची भाषा करून दरवेळी तुम्ही सावंतवाडीच्या मतदारांना बदनाम करण बंद करा, धनशक्तीनेही काही कामच न केल्यामुळे आपली सत्ता गेली याचा अभ्यास करा, अशी टीका भाजप  महिला शहरध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी अपर्णा कोठावळे यांच्यावर केली आहे.नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर अपर्णा कोठावळे यांनी केलेल्या टिकेला मडगावकर यांनी प्रत्युत्तर दिले. मडगावकर म्हणाल्या, आजपर्यंत त्यांनी स्वत: किती निवडणुका लढवल्या याचा विचार करावा. ते स्वत: गावात राहतात मग तिकडेच त्यांनी स्वत: निवडून येऊन कोलगावचा विकास करावा मग सावंतवाडी शहरच्या विकासाबद्दल बोलावे. आमचे अध्यक्ष गावातून आले असले तरी त्यांनी समोर ३ पक्षांनी आघाडी केलेली असताना एवढी वर्ष एकाच पक्षाची सत्ता असताना निवडून येऊन दाखवल. मग हे तुमच्या पक्षाला का जमलं नाही, याचे कोठावळे यांनी आत्मपरीक्षण करावे. एकसारखे जनता जागा दाखवेल अस हास्यास्पद स्टेस्टमेंट देऊ नका. कारण जनतेने परब यांना थेट नगराध्यक्ष बनवून त्यांना आॅलरेडी त्यांची जागा दाखवलेली आहे, आणि यापुढेही जनता त्यांच्यावर व आमच्या भाजप पक्षावर विश्वास ठेवूनच मतदान करतील हे लक्षात ठेवा. कारण तुमच्या पक्षावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही आहे. कारण आता जनता नुसत्या आश्वासन देणा?्या पक्षाला कंटाळली आहे. त्यामुळे अपर्णा कोठावळे यांनी उठसुठ स्टेटमेंट देण्यापेक्षा स्वत: चे आत्मपरीक्षण करावे. सावंतवाडी च्या सुंदरतेत येणाºया दिवसात किती भर पडणार ते येणाº्या दिवसात लोकांना त्यांच्या कार्यातन दिसेलच. शहरांतील अनेक विकास कामे मार्गी लावण्याचे काम नगराध्यक्ष करत आहेत. म्हणून विरोधकांची आग होत आहे, असा टोलाही मडगावकर यांनी लगावला.

You cannot copy content of this page