धनशक्तीच्या जोरावर नगराध्यक्ष झालेल्यांना रस्ता मंजुरीची प्रक्रिया तरी कशी समजणार? सेनेच्या महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठावळे रश्मी माळवदे यांचा सवाल
*💫सावंतवाडी दि.०८-:* सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब व इतर संबंधित पदाधिकाऱ्यानी शिवसेना तालूका प्रमुख रूपेश राऊळ यांच्यावर केलेल्या आरोपास शिवसेना सावंतवाडी तालुका महीला प्रमुख अपर्णा कोठावळे व रश्मी माळवदे यांनी प्रसीद्धी पत्रकाद्वारे जोरदार उत्तर दिले आहे.
मुळात पंतप्रधान योजनेतून मंजूर झालेले रस्ते हे केंद्र सरकारच्या निधीच्या माध्यमातून होत असले तरी त्यास शिफारस ही स्थानिक खासदारांची लागते, जनतेतून प्रचंड बहुमताने निवडून आलेले शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ह्या २६ किमीच्या रस्त्याची शिफारस केल्यावरच हे रस्ते मंजूर झाले आहेत, शासकीय प्रक्रियेनुसार ग्रामपंचायतीचे ठराव हया रस्त्याच्या मंजूरीसाठी लागतात व त्या ठरावांचे फक्त वाचन जिल्हा परिषद व पंचायत समितीत केले जाते हे मडूरा सारख्या ग्रामीण भागांतून सावंतवाडीत येवून धनशक्तिच्या जोरावर नगराध्यक्ष झालेल्या ना कसे समजणार? असा जोरदार टोला देखील त्यांनी लगावला आहे. मंजूर रस्त्याबाबत कोणाला श्रेय घ्यायची गरजच नाही, जनहिताची, विकासात्मक कामे करणे हे प्रत्येक राजकिय पक्षाचे कर्तव्यच आहे हे ह्या महाशयांना माहीत नसावे हे त्यांच्या पक्षाचे दुर्दैव असल्याची मत त्यानी मांडले आहे. ओवळीये, इन्सूली येथील ग्रामपंचायती हया शिवसेनेच्या ताब्यात आहेत. हया ग्रामपंचायतीच्याच शिफारशीनुसार व ठरावानुसार हे रस्ते मंजूर झाले आहेत हयात संजू परब ह्यांनी रस्ते मंजुरीसाठी काय केले ते सांगावे. अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
नाचता येईना अंगण वाकडे ह्या म्हणीनुसार स्वतः जे केबिनमध्ये बसून करतात तेच इतर पक्षाचे प्रमुख करतात असा गोड समज करून, शिवसेनेची सावंतवाडी तालुक्यातील घोडदौड सहन न झाल्याने रुपेश राऊळ या सारख्या सक्षम तालुका प्रमुखावर बिनबुडाचे आरोप करण्यात धन्यता मानतात शिवसेना पक्ष हा ८०% समाजकारण व २०% राजकारण करतो हे संजू परब यांना समजायला हवे कारण त्यांची राजकिय सुरवात ही शिवसेने कडूनच झाली आहे. आज पर्यंत लोकांच्या अडीअडचणी साठी अन्यायाविरुद्ध प्रसंगी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे व उतरत आहे. गरीबांच्या पोटावर पाय ठेवणाऱ्यांना ते कधीच कळणार नाही व फक्त फुक्याची उद्घाटने करुन आपणच रस्ते मंजूर करून आणल्याचा आव आणल्यास येणाऱ्या निवडणुकां मध्ये तुमच्या पक्षाला तुमची जागा जनता दाखवल्या शिवाय रहाणार नाही हे ही लक्षात ठेवा. स्वतःच्या गावाचाच विकास करू न शकलेले संजू परब इतरांचा काय विकास करणार. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. गेल्या १० महीन्यात एक नविन विट लावू न शकलेल्यानी विकास कामावर बोलावे हे खरोखरच दुर्दैवी आहे. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत व सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडीच्या विकासाची कामे तालुका प्रमुख रुपेश राऊळ शिवसेनेच्या माध्यमातून गावोगावी मार्गी लावत आहेत हेही लक्षात घ्यावे.
शिवसेना तालूका प्रमूख रूपेश राऊळ हयांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी तालुक्यातील महीला आघाडीची भक्कम संघटनात्मक बांधणी झालेली आहे त्यामुळे भाजप सारख्या पक्षाला उत्तर देण्यास सावंतवाडीच्या शिवसेना महीला रणरागिणीच पुऱ्या आहेत हे आरोप करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे, आसा इशारा देत समजणाऱ्यास अधिक सांगायची गरज नाही. असे खरमरीत उत्तर दिले आहे.