लोकाभिमुख उपक्रम राबवून शिरोडा रोटरी क्लबचे नाव उज्वल करा

पदग्रहण सोहळ्यावेळी भाई मंत्री यांचे आवाहन

*💫वेंगुर्ले दि.०३-:* रोटरी क्लब म्हणजे आपले एक स्वतःचे कुटुंब आहे कुटुंबाची ज्याप्रकारे आपण काळजी घेतो सुरक्षा करतो त्याचप्रमाणे क्लब तर्फे विविध सामाजिक आरोग्य विषयक शैक्षणिक उपक्रम राबवून शिरोडा रोटरी क्लब चे नाव उज्वल करा असे प्रतिपादन उद्योजक तथा पदग्रहण अधिकारी भाई मंत्री यांनी केले.ते शिरोडा रोटरी क्लबच्या पदग्रहण समारंभावेळी पदग्रहण अधिकारी म्हणून बोलत होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ शिरवळची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली यामध्ये रोटरी क्लब ऑफ शिरोडा च्या अध्यक्षपदी विशाल के तर सचिवपदी अक्षय डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ शिरोडा या संस्थेचा पदग्रहण सोहळा भुमिया पार्क आरवली येथे साध्या पद्धतीत संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाचे पदग्रहण अधिकारी म्हणून उद्योजक सामाजिक कार्यकर्ते गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान शिरोडा या संस्थेचे उपाध्यक्ष भाई मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदग्रहण सोहळा संपन्न झाला. रोटरी क्लब ऑफ शिरोड्याच्या नूतन अध्यक्षपदी उद्योजक विशाल के सचिवपदी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अक्षय डोंगरे खजिनदार भालचंद्र दीक्षित आदी पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मावळते अध्यक्ष एडवोकेट योगेश महाले यांनी वर्षभर राबविलेल्या सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक कार्याचा आढावा घेतला. यावेळी नूतन अध्यक्ष विशाल के म्हणाले की आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारी तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवणार शैक्षणिक व आरोग्य विषयावर जास्त भर देण्याचा आपण प्रयत्न करणार असे सांगितले. यावेळी रोटरीचे वेंगुर्ला येथील राजेश घाटवळ यांनी मार्गदर्शन करून इंटरनॅशनल रोटरी क्लब संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी दिलीप पळशीकर सचिन गावडे राजन शिरोडकर, सचिन दळवी भालचंद्र दीक्षित अविनाश गावडे, सचिन गायकवाड, रत्नदीप मालवणकर आणि रोटेरियन उपस्थित होते सदरचा पदग्रहण ग्रहण सोहळा शासकीय नियमाचे पालन करून ठराविक रोटरीएन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

You cannot copy content of this page