प्राचार्यपदी निवड झाल्याने केला सन्मान
मालवण : (प्रतिनिधी) मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या नवनियुक्त प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांचा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने नियुक्तीपर सत्कार करण्यात आला. मालवण येथील स. का. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले हे निवृत्त झाल्या नंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. उज्वला सामंत यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे. आज स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने स. का. पाटील महाविद्यालय येथे नवनियुक्त प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुधीर धुरी, सचिव अमेय देसाई, खजिनदार दीपक कुडाळकर, संपर्क प्रमुख प्रदीप नाईकसाटम, सदस्य नंदन देसाई, हेमंत रामाडे, किरण ओरसकर, अश्विनी परुळेकर, योगिता रामाडे, प्राध्यापिका डॉ. सुमेधा नाईक यासह श्रीमती बेळेकर, प्रमोद गोसावी, साळुंके, कांदळगावकर, अटक, सोझ आदी कर्मचारी उपस्थित होते.
