अनुप नाईक यांनी स्टंटबाजी’ करण्यापेक्षा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विमा कवच मिळवून दाखवावे…

ओरोस ग्रामपंचायत सदस्य अनंतराज पाटकर यांचे आव्हान_

*💫ओरोस दि.३०-:* हुमरस सरपंच अनुप नाईक यांनी जिल्हा परिषदेने दिलेले विमा कवच नाकरून ‘स्टंटबाजी’ करण्यापेक्षा त्यांच्या शिवसेना पक्षाच्या पालकमंत्री, खासदार आणि सत्ताधारी आमदार यांच्याकडून उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि अन्य सहकारी यांना विमा कवच मिळवून दाखवावे, असे आव्हान ओरोस।ग्रामपंचायत सदस्य अनंतराज पाटकर यांनी केले आहे. ते म्हणाले, गेले वर्षभर जिल्ह्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि इतर सहकारी कोविड काळात ग्रामस्तरारीय नियंत्रण समितीच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना आपला जीव धोक्यात घालून राबवत आहेत. या कालावधीत अनेक सरपंच आणि त्यांचे सहकारी कोरोना बाधित होऊन काही सरपंचांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे. सातत्याने सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटना जिल्ह्यातील सर्व सरपंचांना विमा संरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे मागणी करत होती. पालकमंत्र्यांनी देखील गेल्यावर्षीच सरपंचांना विमा संरक्षण दिल्याची घोषणा देखील केली होती. पण प्रत्यक्षात मात्र कोरोना बाधित किंवा मृत्यू झालेल्या कोणत्याही सरपंच किंवा त्यांच्या कुटूंबियांना या विम्याचा लाभ मिळालेला नाही. हुमरस गावचे सरपंच अनुप नाईक यांनी सरपंचांन बरोबर उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि अन्य सहकारी यांना पण सरपंचां बरोबर विमा कवच मिळावे अशी मागणी केल्याचे ऐकिवात नाही. आज माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे आणि माजी आमदार राजन तेली यांच्या प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी पाठपुरावा करत जिल्हा परिषददेच्या स्वउत्पन्नातुन *जिल्ह्यातील सर्व सरपंचांना कोरोना कालावधीत विमा कवच पुरविण्याचा अतिशय स्तुत्य निर्णय घेतला आहे. मी देखील ग्रामपंचायत सदस्य म्हणून या निर्णयाचा आदर करतो. निश्चितच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पुढील काळात टप्प्याटप्प्याने उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि अन्य सहकारी यांना पण विमा कवच देईल याची खात्री आहे. गेले वर्षभर कोरोना कालावधीतील गावास्तरावरील उपाययोजना राबविण्यासाठी राज्य सरकार फक्त आदेश काढण्याचे काम करत आहे. मात्र यासाठी लागणारा निधी मात्र केंद्र सरकारने दिलेल्या 14 आणि 15व्या वित्त आयोगातून खर्च करायला लावून ग्रामपंचायतीना वेठीस धरत आहे. त्याचवेळेस सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मात्र आरोग्य यंत्रणांना क्षमतेने काम करण्यासाठी रुग्णवाहिका शववाहिक पुरविणे, पत्रकारांसाठी लसीकरणाची व्यवस्था, जिल्ह्यातील अपंग आणि दुर्धर आजाराने ग्रस्त लोकांसाठी मोबाईल लसीकरणाची सोय, गावपातळीवरील लसीकरणाची व्यवस्था इत्यादी निर्णय घेऊन राज्यात आदर्शवत काम करत आहे,।असेही ते।म्हणाले.

You cannot copy content of this page