*कुडाळ शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी
*💫कुडाळ दि.२८-:* कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवा अशी मागणी कुडाळ शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात आली.यावेळी हॉटेल विआर जवळील रेल्वे ब्रिजकडे असणाऱ्या खड्ड्यांबाबत निवेदन देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. येत्या पाच दिवसात खड्डे बुजवण्याची प्रक्रिया सुरू न केल्यास आंदोलन केले जाईल आणि या आंदोलनाला सर्वस्वी आपण जबाबदार रहाल असा इशाराही देण्यात आला. कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस ते नाबरवाडी – दत्तनगर या रस्त्यावर बहुसंख्य खड्डे पडलेले आहेत. तसेच कुडाळ एमआयडीसी रस्ता ते गवळदेव मंदिर जवळील रस्त्यावर असणारे चर आणि खड्डे याचेही लक्ष वेधले. या रस्त्यावरून नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे या खड्ड्यांचा वाहनधारकांना नाहक त्रास होत होता. त्याचबरोबर या रस्त्यावरून एखाद्या रुग्णवाहिकेतून रुग्ण न्यायचा कसा असा प्रश्न नातेवाईकांना पडत असतो त्यामुळे हा रस्ता मुख्य असल्याने या रस्त्याची डागडुजी करण्याची प्रामुख्याने गरज होती. बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील असताना या रस्त्याला मंजुरी मिळाली होती, परंतु ठाकरे सरकारने त्यावेळच्या कामांना स्थगिती दिली होती. परंतु काही दिवसांपूर्वी हे काम मंजूर झाले आणि त्यानंतर त्याची निविदा प्रक्रिया झाली, परंतु पावसाळा डोळ्यासमोर असताना खऱ्या अर्थाने हे काम मे महिने अगोदरच व्हायला हवे होते परंतु तसे न झाल्यामुळे वेळ काढून धोरणामुळे या रस्त्याचे काम रखडले. सद्यस्थितीत या रस्त्यावर खड्डे पडून दुर्दशा झालेली असल्याने व वाहनधारकांना त्रास होत असल्याने तात्काळ खड्डे बुजवणे हे नागरिकांच्या जीविताच्या दृष्टीने आणि वाहनधारकांच्या जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, त्यामुळे तात्काळ खड्डे बुजवले गेले पाहिजे ही भूमिका भारतीय जनता पार्टी कुडाळ शहरच्यावतीने घेण्यात आली आणि तात्काळ यावर कार्यवाही झाली नाही तर आंदोलन केले जाईल असा इशाराही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आला यावेळी कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे, शक्ती केंद्रप्रमुख राजू बक्षी, नाबरवाडी बूथ प्रमुख दीपक सावंत प्रभावळकर, शहर महिला अध्यक्ष ममता धुरी, माजी नगरसेविका सौ. साक्षी सावंत, माजी नगरसेवक सुनील बांदेकर प सदस्य सौ. शैलजा बक्षी, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद देसाई, शक्ती केंद्रप्रमुख राकेश नेमळेकर, निलेश परब, बाळा कुडाळकर, गुरु कुंभार, सौ विशाखा कुलकर्णी उपस्थित होते.
