लेडी सिंघम पोलिस निरीक्षक आर जी नदाफ यांच्यासोबत केली चर्चा
*💫दोडामार्ग दि.२७-:* आजची महिला ही प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे कोविड च्या महामारीत सुद्धा महिला देशसेवा करत कुटुंब सांभाळताना दिसत आहे परंतु आजही महिलांवर होणारे अत्याचार आणि महिलांचे संरक्षण ही सामाजिक बांधिलकी लक्षात घेता आपला देव आपला देश आणि धर्माच्या नितीमुल्याचे जतन करुन येणाऱ्या काळात महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या उद्देशाने हिरकणी या ग्रुपची स्थापना करण्यात आली. यावेळी दोडामार्ग पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या आणि लेडी सिंघम म्हणून परिचित असलेल्या आर.जी.नदाफ यांची भेट घेत सध्या स्त्रियांवर होणाऱ्या वेगवेगळ्या अत्याचाराबद्दल चर्चा करण्यात आली.यापुढे स्त्रीयांवर कोणत्याही प्रकारचे अन्याय अत्याचार झाल्यास हिरकणी ग्रुपच्या कायम पाठीशी राहु असे यावेळी सांगण्यात आले.त्याचबरोबर हिरकणी ग्रुपच्या वतीने त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी हिरकणी ग्रुपच्या अध्यक्षा प्रतिमा साईनाथ लुडबे इंडस्ट्रीज उद्योजिका ,संस्थापिका सोनम गवस होम रिवाइज एज्युकेशन,सचिव तथा पत्रकार जान्हवी भोसले ,सदस्य मानसी महेश गवस उपसरपंच झोळंबे यासह आदी उपस्थित होते.
