*💫सावंतवाडी दि.२७ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ३१ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ५ तर ग्रामीण भागात २६ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
मिळालेल्या अहवालानुसार तालुक्यातील 31 रुग्णांपैकी शहरात खासकीलवाडा 1, माठेवाडा 1, सावंतवाडी 3 असे 5 रुग्ण आढळले आहेत तर ग्रामीण भागात माडखोल 4, बांदा 4, मळगाव 2, सोनुर्ली 2, आजगाव भोम 1, आंबोली 3, कारिवडे 1, चराठे 1, शेर्ला 1, सांगेली 2, इन्सुली 1, ओटवणे 1, धाकोरे 2, कवठणी 1 असे 26 रुग्ण आढळले आहेत आतापर्यंत 5226 रुग्ण आढळून आले आहेत तर 135 जणांचा मृत्यू झाला आहे साध्य स्थितीत 451 रुग्ण सक्रिय आहेत
