कणकवली शहरात सदस्य नोंदणीचा शुभारंभ
*💫कणकवली दि.०६-:* हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला माननारे अनेक पक्षविरहित कार्यकर्ते आहेत.यामुळेच सदस्य नोंदणी देखील संघटनेवर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांची करा. विकासाचा झंझावतापूर्वी देखील आम.वैभव नाईक यांनी गड राखला.आता सत्ता महाविकास आघाडीची असून यापुढे विकास कामे गतीने होतील,असा विश्वास शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी व्यक्त केला. कणकवली शहराच्या वतीने सदस्य नोंदणीचा शुभारंभ विजय भवन येथून करण्यात आला.याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी निरीक्षक विकास कुडाळकर,महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव,तालुकाप्रमुख शैलेश भोगले,नगरसेवक सुशांत नाईक,कन्हैया पारकर,नगरसेविका माही परुळेकर,मानसी मुंज,अँड.हर्षद गावडे,प्रमोद मसूरकर,प्रसाद अंधारी,सोमा गायकवाड,वैभव मालंडकर,गौरव हर्णे,संतोष पुजारेतेजस राणे, आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. व्यक्ति प्रेम करण्यापेक्षा पक्षावर प्रेम करणाऱ्या सदस्यांची नोंदणी झाली पाहीजे.जेणे करून आया राम गया राम थांबले पाहिजेत.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विषयक अडचणी दूर करत मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून जिल्हावासियांची अडचण दूर केली आहे.यासोबतच जिल्हयाच्या पर्यटन दृष्टीकोनातून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून पर्यटनाच्या माध्यमातून जिल्हयाचा विकास होत आहे. हा जिल्हा सुजलाम सुफलाम होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकास कुडाळकर म्हणाले,शहरात १७ प्रभागात प्रमुख नेमून सदस्य नोंदणी करण्यात येत आहे.या वार्डातील प्रत्येक मतदार हा सभासद व्हावा यादृष्टीने नियोजन करण्यात आले असून प्रत्येक प्रभागात २०० हुन अधिक सदस्य नोंदणी करण्याचे निश्चित केले आहे.यामधून शिवसेना प्रमुखांना माननारे सभासद नोंदणी करून सेना बळकटी साठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सुशांत नाईक म्हणाले,हे अभियान म्हणजे सेनेच्या माध्यमातून झालेली विकास कामे यासोबतच मतदारांच्या अडचणी जाणून घेऊन त्या निवारण करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून जनतेच्या उर्वरित कामांना गती देण्याचे काम करणार असल्याचे सांगत जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून आपले शहर अग्रेसर असल्याचे दाखवून देणायचा निर्धार केला. प्रभाग निहायक सदस्य नोंदणी पुढील प्रमाणे – प्रभाग क्र.१- शेखर राणे,संतोष राणे,तेजस राणे,प्रभाग क्र.२- साक्षी आमडोस्कर,रोहिणी पिळणकर,प्रमोद पिळणकर,प्रभाग क्र.३-संजना संथ,रवी राणे,सुमित राणे,प्रभाग क्र.४ दादा परब,भिवा परब,प्रभाग क्र.५-अश्विनी मोर्ये,मेघन सरंगले,प्रभाग क्र.६ संदेश वाळके,कन्हैया पारकर,आदित्य सापळे,प्रभाग क्र.७- प्रसाद अंधारी ,महेश देसाई,प्रभाग क्र- अनिल जाधव,लुकेश कांबळे,भक्ती जाधव,प्रभाग क्र.९- वैभव मालंडकर,विलास कोरगावकर,समीर सावंत,प्रभाग क्र.१०- सोमा गायकवाड,माही परुळेकर,प्रमोद मसुरकर,संतोष पुजारे,प्रभाग क्र.११- सुजित जाधव,संतोष पुजारे प्रभाग क्र. १२- गौरव हर्णे,बाळा वराडकर,प्रभाग क्र.१४ – अमित मयेकर,रुपेश नार्वेकर,संजय पारकर,अजित काणेकर,अमोल रासम, प्रभाग क्र.१५-योगेश मुंज,प्रभाग क्र.१६- सोहम वाळके,रुपल परब,प्रभाग क्र.१७- समीर सावंत,बाबू जाधव अशी प्रभाग निहायक जबाबदारी देण्यात आली असून वार्डात २०० हुन अधिक सभासद नोंदणी करण्याचे निश्चत करण्यात आले आहे. यावेळी कणकवली वरचीवाडी महिला शाखा प्रमुखपदी रोहिणी पिळणकर याची नियुक्ती करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देत अभिनंदन करण्यात आले.आभार नगरसेवक सुशांत नाईक यांनी मानले.