खास.विनायक राऊत यांनी खारेपाटण येथील इसवलकर कुटुंबियांचे केले सांत्वन

*💫कणकवली दि.२४-:* खारेपाटणचे शिवसेनेचे प्रदीप प्रभाकर ईसवलकर यांचे कोरोनाच्या महामारीत निधन झाले होते.खास. विनायक राऊत यांनी कै. प्रदीप ईसवलकर यांच्या कुटुंबाची खारेपाटण संभाजीनगर (गुरववाडी) येथे भेट घेत कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या सोबत खारेपाटण – तळेरे शिवसेना विभाग प्रमुख महेश कोळसुलकर, खारेपाटण शाखाप्रमुख शिवाजी राऊत आदी उपस्थित होते. प्रदीप इसवलकर याच्या जाण्याने आपण खारेपाटणमधील एका सच्चा कार्यकर्त्याला तसेच शिवसेना पक्षावर व भगव्या झेंड्यावर प्रचंड निष्ठा असलेल्या एका शिवसैनिकाला कायमचे मुकलो. असल्याचे भावपूर्ण उदगार खासदार विनायक राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.” प्रदीप ईसवलकर यांचे वडील प्रभाकर ईसवलकर व भाऊ देवानंद ईसवलकर यांच्याशी खासदार विनायक राऊत यांनी चर्चा करून त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला.

You cannot copy content of this page