जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आले वाटप*
*💫कुडाळ दि.२४-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दप्तर वाटप कार्यक्रम कुडाळ तालुक्यातील नारूर येथ कातकरी समाज वाडी येथील समाज मंदिरात संपन्न झाला. जि.प. अध्यक्षा संजना सावंत यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नितेशजी राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपण नेहमीच कातकरी समाजातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहून आवश्यक ते सर्व सहकार्य करून अपूर्ण विकास कामे लवकरात लवकर मार्गी लावणार असे आश्वासन दिले आणि या चांगल्या उपक्रमा बद्दल ओरोस मंडलातील करीकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कुडाळ ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, कुडाळ सभापती नूतन आईर, ओबीसी जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पप्प्या तवटे, रुपेश कानडे, नारूर सरपंच अलका पवार, बाव सरपंच नागेश परब, तुळसुली सरपंच नागेश परब, सोशल मीडिया प्रमुख राजवीर पाटील, योगेश घाडी, प्रितेश गुरव सामाजिक कार्यकर्ते उदय आईर इ. उपस्थित होते
