राजू शेटकर यांचा आरोप
*💫बांदा दि.२०-:* मडुरा-पाडलोस-रोणापाल सिमाभागात सुरू असलेले तिलारी पाटबंधारा कालव्याचे काम निकृष्ठ दर्जाचे असून अनेक ठिकाणी कालव्याला भेगा पडल्या आहेत. पाणी व नागरिकांना जाण्यासाठी ठेवलेल्या पुलाच्या भिंतीही कोसळल्या आहेत. त्यामुळे सदर काम दर्जाहीन व निकृष्ठ असल्याचा आरोप शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी तिलारी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता बी.आजगेकर यांच्यासमोर केला. मात्र कालव्याचे काम सुरू असून पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करूनच कालव्यात पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच सदर भेगा ठेकेदाराकडून बुजविण्यात येणार असल्याचे श्री.आजगेकर म्हणाले. कालव्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेले सहाय्यक अभियंता बी.आजगेकर यांच्या निदर्शनास श्री.शेटकर यांनी दर्जाहीन कामे आणून दिली. यावेळी शेतकरी सुधीर गावडे, आनंद गावडे, कनिष्ठ अभियंता महेंद्र डांबरेकर आदी उपस्थित होते.
