सैन्यातील थरारक अनुभव ते अर्जुन पुरस्काराची घोडदौड यावर विशेष चर्चासत्र
*💫दोडामार्ग दि.०४-:* दोडामार्ग तालुक्यातील सरगवे गावचे सुपुत्र सुभेदार अजय सावंत यांना घोडेस्वारी खेळात मानाचा अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला होता. ही तालुक्यासाठी भूषणावह बाब असून तालुक्यात सामाजिक कार्यात आघाडीवर असणाऱ्या ‘स्नेहबंध’ ग्रुपने त्यांच्या सत्काराचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सरगवे मंदीरातील सभागृहात रविवारी सायंकाळी ४. ०० वा. होणार आहे. यावेळी स्नेहबंध ग्रुप च्या वतीने सुभेदार सावंत यांच्याशी सैन्यदलातील थरारक अनुभव ते अर्जुन पुरस्कारा पर्यंत त्यांची झालेली घोडदौड याविषयावर चर्चासत्र होणार आहे.