*वाढदिवसानिमित्त गरजु रुग्णांना २७ रक्त पिशव्या मोफत;जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची. संकल्पना
*💫कुडाळ दि.१५-:* मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त ओरोस रक्तपेढीत जिल्हा भरातील गरजु रुण्णांना २७ रक्त पिशव्या मोफत दिल्या. जिल्हा मनसेच्यावतीने।जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची ही संकल्पना होती. सामाजिक उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा करा असे राज ठाकरेंनी.आवाहनाला आपल्या पत्रातून आवाहन केले होते. त्या आवाहनाला जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वाढदिवसानिमित्त ओरोस रक्तपेढीत जिल्हा भरातील गरजु रुण्णांना २७ रक्त पिशव्या मोफत दिल्या. तसेच सावंतवाडी तालुक्यात सर्व विज लाईन कंत्राटी कामगारांचे इन्शुरन्स मेडिक्लेम, पत्रकारांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. कोविड सेंटरमध्ये अंडी वाटप फळे, स्टीमर मशीन तसेच वृक्षारोपण असे अनेक विविध कार्यक्रम सामाजिक कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या माध्यमातून वाढदिवस साजरा केला
