तरुणीचा असाही प्रामाणिकपणा !

दुकानात विसरून गेलेला मोबाईल तरुणीने केला परत;मालवण येथील दुकानातील घटना

*💫मालवण दि.१५-:* ग्राहक दुकानात विसरून गेलेला मोबाईल दुकानात काम करणाऱ्या तरुणीने त्या ग्राहकास तो परत करत प्रामाणिकपणा दाखविल्याची घटना आज मालवण बाजारपेठेत घडली. मालवण मधील अविनाश खानोलकर हे मालवण बाजारपेठेतील कर्पू स्वामी या दुकानात गेले असता आपला मोबाईल ते दुकानातच विसरून गेले. मात्र दुकानात राहिलेला हा मोबाईल प्रियतमा बिरमोळे (रा. घुमडे) या दुकानात काम करणाऱ्या तरुणीच्या निदर्शनास आला. एखादा ग्राहक मोबाईल विसरुन गेला असावा या विचाराने तिने मोबाईल धारकाचा शोध घेण्यास सुरुवात करत आजूबाजूच्या दुकानदारांना याची कल्पना देऊन ठेवली. दरम्यान, आपला मोबाईल गहाळ झाला म्हणून दीड तास मोबाईलच्या शोधात असलेल्या अविनाश खानोलकर यांना बाजारपेठेत एका दुकानात मोबाईल सापडला असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी चौकशी करून कर्पू स्वामी दुकान गाठले. त्यावेळी प्रियतमा हिने तो मोबाईल खात्री पटवून खानोलकर यांना परत केल्याने खानोलकर यांनी तिचे आभार मानले. प्रियतमा हिच्या जागरूकतेबद्दल व प्रामाणिकपणा बद्दल सर्वांकडून तिचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page