रान कुत्र्याने हल्ला केलेल्या जखमीना आर्थिक मदत नाही

आंबोली, ता.१३: आंबोलीत रान कुत्र्याने हल्ला केलेल्यांना अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही पालकमंत्री उदय सामंत यांनी याकडे तत्काळ लक्ष देवून नुकसानीच्या पंचनामा ग्राह्य धरून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी पालकमंत्री यांना केले आहे. आंबोलीत २३ एप्रिल ला जंगली प्राणी रानकुत्र्याने हैदोस घातला होता.त्यात साधारण १८ लोक जखमी झाले.अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ला केला त्यातील जनावरे ही दगावली.वनखात्याने पंचनामे केले.मात्र त्यांना वन विभागाकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही.हॉस्पिटल खर्चासाठी डॉक्टर सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे तसेच मेडिकल बिल.त्यामुळे वनविभागाकडून कोणतीही नुकसानी मिळाली नाही. वन्यप्राण्यांकडून आंबोलीत नुकसानी होत असते मात्र शासनाकडून भरपाई मिळत नाही.कागदपत्र होत नाही त्यामुळे याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे.पंचनामे ग्राह्य धरून नुकसान भरपाई द्यावी.जिल्ह्यात कोटीची उड्डाणे दिसत आहेत मात्र आंबोलीत नुकसानी मिळत नाही.त्यामुळे पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी केली आहे.

पालकमंत्र्यांना मदत देण्यासाठी अनिल चव्हाण यांचे निवेदन

You cannot copy content of this page