लोकसहभागातून न्हावेली गाव कोरोना मुक्त

राजन मुळीक : संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे उद्घाटन

*💫बांदा दि.१३-:* प्रशासनाच्या निर्देशाचे पालन सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावाने सदोदित केले आहे. त्यामुळे गावात एकही सक्रिय रुग्ण सद्यस्थितीत नाही आणि हे सर्व लोकसहभागातूनच शक्य झाले आहे. सरकारच्या कोरोना मुक्त गावासाठी ठेवण्यात आलेल्या बक्षिसाचा मान न्हावेली गावाने मिळवावा. गावात एकही रुग्ण नसताना विलगीकरण कक्षासाठी उचललेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे उद्गार, जिल्हा परिषद सदस्य राजन उर्फ राजू मुळीक यांनी काढले. जिल्हा परिषद शाळा नंबर 4 मध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे उद्घाटन राजन मुळीक व सरपंच प्रतीक्षा गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावंतवाडी गटविकास अधिकारी व्ही. नाईक, उपसरपंच विठोबा गावडे, माजी सरपंच शरद धाउसकर, ग्रा.पं. सदस्य भावना धाउसकर, जयश्री नाईक, प्रेमलता मसुरकर, ग्रामसेवक तृप्ती राणे, पोलिस पाटील अनंत मालवणकर, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशाताई, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ आनंद मसुरकर, राजन कालवणकर, प्रवीण गावडे, विशाखा कांबळी, शिक्षक श्री.कुंभार सर आदी उपस्थित होते. ग्रामसेवक तृप्ती राणे म्हणाल्या की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत न्हावेली गावाने घेतलेल्या खबरदारीमुळे कोरोनाचा शिरकाव गावात झाला नाही. आशासेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी केलेल्या मोलाच्या कामगीरीमुळे पूर्ण गाव कोरोना मुक्त राहिला. दुसऱ्या लाटेत काहीसे रूग्ण गावात आढळून आले परंतु योग्य नियोजनामुळे आज पुन्हा एकदा न्हावेली गाव कोरोना मुक्त झाला असल्याचा उल्लेख ग्रामसेवक राणे यांनी केला. गटविकास अधिकारी नाईक म्हणाले की, शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन न्हावेली गावात झाल्यामुळे सद्यस्थितीत कोरोनाचा एकही रुग्ण नाही. गावात जर कुणाला सर्दी, ताप अशी लक्षणे सर्वेक्षणात आढळून आल्यास त्वरीत रूग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन श्री.नाईक यांनी केले. दरम्यान, सुरू करण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षासाठी आर्थिक किंवा वस्तू स्वरुपात अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये राजन मुळीक, सुधाकर राणे, राजन कालवणकर, महादेव चौकेकर, अरुण गावडे, राजेश नेमण, विठोबा गावडे, नामदेव धाउसकर, हरीश धाउसकर, अभिषेक धाउसकर, हेमचंद्र सावळ, तृप्ती राणे, राजाराम पार्सेकर, शरद धाउसकर, प्रसाद गावडे यांनी मदत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक तृप्ती राणे यांनी करत आभारही मानले.

You cannot copy content of this page