कोरोनावर मात करण्यास सत्ताधारी अपयशी

भाजपाचे सोमवारी निषेध आंदोलन;सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

*💫सावंतवाडी दि.१३-:* जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना देखील रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, कमी असलेला मेडिकल स्टाफ, कोरोना आजाराचा सामना करण्यास अयशस्वी ठरलेले निष्क्रिय पालकमंत्री, महाभकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी भाजप कडून निषेध आंदोलन पुकारण्यात आले आहे. उद्या सोमवार दिनांक १४ जुन रोजी सकाळी १०:३० वाजता कुटीर रुग्णालय समोर हे आंदोलन भाजपकडून पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात तालुक्यातील भाजपचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, जिल्हा कार्यकारणी सदस्य, तालुक्यातील तिन्ही मडल कार्यकारणी सदस्य, महिला मोर्चा, मागासवर्गीय आघाडी, अल्पसंख्यांक आघाडी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, कार्यकर्ते यांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, आंबोली मंडल अध्यक्ष संदीप गावडे, सावंतवाडी मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page