जिल्हा रुग्णालयात सेनेचा उपक्रम आ वैभव नाईक यांची उपस्थिती
*💫ओरोस दि.१२-:* महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दिनांक १३ जुन रोजी इच्छापूर्ती मंगल कार्यालय, आरटीओ ऑफिस जवळ ओरोस येथे सायंकाळी ४ वाजता होणार आहे. यावेळी हा सत्कार आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, जि. प. सदस्य तथा गटनेते नागेंद्र परब, अतुल रावराणे, संदेश पारकर, संग्राम प्रभुगावकर आदींच्या हस्ते होणार आहे.
