*💫वेंगुर्ला दि.०४-:* दिव्यांगांना मिळणाऱ्या सवलतीमध्ये कोणतीही अडचण आल्यास तालुका विधी सेवा समिती वेंगुर्लातर्फे त्याचे निरसन केले जाईल, असे आश्वासन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश वि. द. पाटील यांनी राष्ट्रीय दिव्यांग दिन प्रसंगी दिले. तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला व तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी वेंगुर्ला तहसिलदार कार्यालय येथे राष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी विस्तृत स्वरुपात दिव्यांगांच्या समस्या व त्यांच्या प्रती समाजाने घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करताना न्यायाधीश पाटील बोलत होते. प्रमुख पाहुणे तहसिलदार प्रविण लोकरे यांनी दिव्यांगांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या सवलतींबाबत आपण स्वतः जातीने लक्ष घालून त्या मार्गी लावणार असल्याचे सांगितले. तर साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रुपाली पाटील यांनी शासनाकडून दिव्यांगांना मिळणाऱ्या विविध योजनांबाबत विस्तृत स्वरुपाचे मार्गदर्शन केले. यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील बहुसंख्य दिव्यांग उपस्थित होते.
दिव्यांगांना अडचणी भासल्यास त्याचे निरसन करु : न्यायाधीश पाटील
