तळेरे ग्रामपंचायत येथे आधार सेंटर शुभारंभ

*💫कणकवली दि.०७-:* कणकवली तालुक्यातील तळेरे ग्रामपंचायत येथे आज आधार केंद्र सुरु करण्यात आले तळेरे सरपंच सौ साक्षी सुर्वे यांच्या हस्ते आधार केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसरपंच दिनेश मुद्रस,सदस्य स्वप्निल वनकर ग्रामसेवक युवराज बोराडे,राजेश जाधव ,रवींद्र भोगले आधार केंद्रचालक श्री. बिडये तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आधार कार्ड नुतणीकरण करणे तसेच बदल करणे यासाठी ग्रामस्थाना कणकवली सेंटर ला जावे लागत होते आता तळेरे ग्रामपंचायतमध्ये सेंटर झाल्याने ग्रामस्थांच्या सोयीचे झाले आहे. सरपंच साक्षी सुर्वे यांनी श्री. बिडये यांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page