कणकवली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट होणार

कोरोना रोखण्यासाठी नगरपंचायत येथे बैठकीत निर्णय

*💫कणकवली दि.०७-:* कणकवलीत वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, आज कणकवली न.पं. मधे नगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी अवधूत तावडे व व्यापारी यांची नगराध्यक्ष दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व व्यापारांना कोरोनाची आटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून याची अंमलबजावनी ही बुधवार पासून होणार आहे. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी आपली कोरोनाची आटीपीसीआर टेस्ट करुण घ्यावी असे आवाहन करण्यात आले. तब्बल अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर राज्यातील कोरोना निर्बंध आजपासून काहीसे शिथील झाले आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्हा चौथ्या चरणात असून आज पासून अत्यावश्यक सेवेची दुकाने स. ७ ते ४ वा. पर्यंत चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांनी आपण नियोजन करून याबाबत निर्णय घेवून, कशा प्रकारे ही टेस्ट करावी, याबाबत माहिती देणार असल्याचे व्यापारी संघाकडून सांगण्यात आले. तसेच आरटीपीसीआर टेस्ट स्वतः व्यापारी करू शकतात किंवा न.पं.च्या माध्यमातून ही टेस्ट करण्यात येईल. दिवसाला किती जणांची टेस्ट करायची, व ती टेस्ट किती टप्य्यात करायची, याची माहितीे. आरटीपीसीआर टेस्ट बाजारपेठेतील सर्वच दुकान मालक यांची करणार असल्याचे देखील मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, किशोर राणे, बंडू गांगण तसेच व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, उपाध्यक्ष राजू पारकर, विशाल कामत, शेखर गणपत्ये आदी व्यापारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page