माजगाव गावात आजपासून जनता कर्फ्यू…

गावातील कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामपंचायत, गावातील लोकप्रतिनिधी यांचा निर्णय

*💫सावंतवाडी दि.०७-:* माजगाव ग्रामपंचायत, गावातील आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी मिळून घेतलेल्या निर्णयानुसार माजगाव गावातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी आज सोमवारपासून माजगांव गावांत पूर्णतः प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. अलीकडील काही दिवसात माजगाव गावात सातत्याने मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत असून काही जणांचा बळीही गेला आहे. या पार्श्वभूमीवर माजगाव ग्रामपंचायतीच्या नियंत्रण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत माजगाव सरपंच दिनेश सावंत, पोलीस अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य, तंटामुक्तीचे सदस्य, आरोग्य विभागाचे कर्मचारी जिल्हा परिषद सदस्या सौ रेश्मा सावंत, अन्य लोकप्रतिनिधी पदाधिकारी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी माजगाव गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आजपासून १५ जूनपर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे गावच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून गावात येणाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. विनाकारण गावात फिरणाऱ्या ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, तसेच बाहेरच्या गावातून माजगाव गावांमध्ये कोणालाही घेतले जाणार नाही आणि माजगाव ग्रामस्थांना इतर गावांमध्ये सोडले जाणार नाही. यात फक्त वैद्यकीय सुविधांसाठी मुभा देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page