Headlines

नवीन नियमावली जाहीर करत व्यापाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने दिला दिलासा

दुकाने उघडी ठेवण्याच्या वेळेत बदल केल्याने पुंडलिक दळवी यांनी मानले आभार*

*💫सावंतवाडी दि.०६-:* राज्यात राज्य शासनाने अनलॉक प्रक्रिया सुरू केली असून, जिल्ह्यात उद्या पासून चौथ्या स्तरातील नियम लागू होणार आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर शनिवार आणि रविवार या दिवशी वैद्यकीय सेवा वगळता अन्य सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात १० ते ११ यावेळेत होणारी गर्दी आणि त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी या वेळेत बदल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमावली नंतर पुंडलिक दळवी यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.

You cannot copy content of this page