जिल्हा कोरोना मुक्त करण्यात कणकवली नगरपंचायतचा सिहाचा वाटा
*💫कणकवली दि.०६-:* 25 बेडचे सोई सुविधायुक्त कोविड केअर सेंटर उभारून कणकवली न.प.ने केवळ जिल्ह्यासमोरच नव्हे तर राज्यात आदर्श निर्माण केला.आता 100 बेडचे संस्थात्मक कोरोना विलगीकरण कक्ष स्थापन करून कणकवली नगरपंचायतीचे काम राज्यात आदर्शवत असल्याचे दाखवून दिले आहे.भाजपा कार्यकर्ते विकासात राजकारण करत नाहीत. तर दिलेला शब्द पाळतात हे विरोधकांनी लक्षात घ्यावे.असा टोला लगवताना नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांची टीम ही प्रशासनाच्या साथीने करत असलेले काम अभिमानास्पद असल्याचे गौउद्गार आम.नितेश राणे यांनी काढले.विलगीकरण केंद्राचे लोकार्पण शिवराज्याभिषेक दिनी होतोय याचे समाधान आहे.रयतेचे राज्य म्हणून ज्या दिवशी ओळख मिळाली त्याच दिवसाचे औचित्य साधत एक चांगला मुहूर्त साधला असल्याचे आमदार नितेश राणे म्हणाले. कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय येथे न.प.च्या माध्यमातून 100 बेडचे कोरोना विलगीकरण कक्षाचा लोकार्पण सोहळा प्रातांधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यावेळी आम.नितेश राणे,जी.प.अध्यक्षा संजना सावंत नगराध्यक्ष समीर नलावडे,, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, सभापती मनोज रावराणे, तहसीलदार रमेश पवार,गट विकास अधिकारी अरुण चव्हाण,मुख्याधिकारी अवधूत तावडे,गटनेते संजय कामतेकर,नगरसेविका मेघा गांगण,नगरसेवक विराज भोसले,शिशिर परूळेकर, किशोर राणे,महेश सावंत,प.स.सदस्य मिलिंद मेस्त्री,व्यापारी संघटना अध्यक्ष दीपक बेलवलकर,रोटरीचे अँड.दीपक अंधारी,न.प.कर्मचारी किशोर धुमाळे,मयूर शिंदे,मनोज धुमाळे आदी कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना राणे म्हणाले निवडणुकीच्या वेळी मतदानासाठी लोकांजवळ जेव्हा आम्ही आग्रह धरतो की समीर नलावडे किंवा आमच्या सर्व नगरसेवकांना मतदान करा. त्यावेळी आमची जबाबदारी असते. व या माध्यमातून मतदारांना न्याय देण्याचे काम आमच्या कणकवली नगरपंचायत ची सर्व टीम करत आहे. कोविडच्या लढाईमध्ये आमच्या कणकवली नगरपंचायत मी पहिल्यांदा तीस बेडचे कोविड केअर सेंटर व आता हे शंभर बेडचे संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू करून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. कोविड ची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना हे विलगीकरण केंद्र निश्चित फायदेशीर ठरेल. या विलगीकरण केंद्रात मनोरंजनासह अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांनाही मानसिक समाधानही मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना मुक्त करण्यात आमच्या कणकवली नगरपंचायत चा सिहाचा वाटा असेल अशी मला खात्री असल्याचेही गौरवोद्गार राणे यांनी काढले.
