Headlines

‘मत वाचवा, देश वाचवा’;

सावंतवाडीत काँग्रेसचे उद्या ‘लोकशाही वाचवा’ आंदोलन..

⚡सावंतवाडी ता. ७-: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निषेधार्थ ‘मत वाचवा, देश वाचवा’ या घोषवाक्यासह ‘लोकशाही वाचवा सप्ताहा’ अंतर्गत निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
हे आंदोलन गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोर करण्यात येणार आहे. या आंदोलनात सावंतवाडी तालुक्यातील लोकसभा व विधानसभा उमेदवार, प्रदेश पदाधिकारी, प्रांतिक सदस्य, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी तसेच महिला, युवक, NSUI, सेवादल, ओबीसी, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती-जमाती, INTUC, पर्यावरण आदी सेल व विभागांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.तसेच ग्रामपंचायत सदस्य, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय मालवणकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page