मालवण दि प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी श्री. संजय आग्रे मित्र मंडळ, फोंडाघाट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धेत डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथील प्रथम वर्ष कला शाखेचा विद्यार्थी कु. योगेश राजन ताम्हणकर याने
१०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत एकूण सहा विद्यार्थ्यांनी विविध मैदानी क्रीडा प्रकारांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
योगेशला या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक प्रा. श्री. कविटकर यांचे मार्गदर्शन लाभले.
योगेश ताम्हणकर याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनीही त्याचे कौतुक करून अभिनंदन केले.
